अकोला : जिल्ह्यात सुरु असलेला कोरोनाचा हैदोस थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या विषाणूने गत चार महिन्यांपासून कहर केला आहे. रविवार, २ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे बाळापूर येथील आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ११० वर गेली आहे. तर रविवारी आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६६७ झाली आहे.पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी ओळख झालेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांचे प्रमाणही जिल्ह्यात लक्षणीय आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १२९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सिंधी कॅम्प येथील एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २६६७ झाली आहे.८१ वर्षीय वृद्ध दगावलाकोरोनाच्या बळींची संख्या वाढतच असून, रविवारी बाळापूर येथील ८१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीस २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.४४३ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २११४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४४३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा आणखी एक बळी; एक पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ११० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 11:42 AM
रविवार, २ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे बाळापूर येथील आणखी एकाचा मृत्यू झाला.
ठळक मुद्दे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ११० वर गेली आहे.एकूण रुग्णसंख्या २६६७ झाली आहे.