अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, ४ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे मुर्तीजापूर येथील एकाचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे. तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २७०८ वर पोहचली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर उर्वरित १७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह सात अहवालांमध्ये तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील दोघांसह, जूने शहर, वाडेगाव, कौलखेड, न्यू राधाकिसन प्लॉट व डाबकी रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.मुर्तीजापूरात एकाचा मृत्यूकोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच असून, मंगळवारी मुर्तीजापूर येथील ५० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ३१ जुलै रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.३८६ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २२०९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल- २४पॉझिटीव्ह- ७निगेटीव्ह- १७आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३३९+३६९=२७०८मयत-११३डिस्चार्ज- २२०९दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह- ३८६)
कोरोनाचा आणखी एक बळी; सात नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ११३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 11:41 AM
यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे.
ठळक मुद्देएकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २७०८ वर पोहचली आहे. सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.