अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने शनिवारी दुपारी अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम सुरू होताच परिसरात अतिक्रमण करणाºया लघू व्यावसायिकांनी आपले अनधिकृत असलेले बिºहाड हटविण्यास सुरुवात केली. दरम्यान, एमआयडीसी प्रशासनाने फेस क्रमांक १, २, ३ मधील अतिक्रमित ठेले उचललेत. एमआयडीसी परिसरात प्रथमच अतिक्रमण हटाओची मोहीम राबविण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.औद्योगिक वसाहतींमध्ये गत काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने औद्योगिक वसाहतींमध्ये अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्याचे अधिकार एमआयडीसी यंत्रणेलाच दिले. यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्याचेदेखील सुचविले गेले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी अकोला एमआयडीसी प्रशासनाने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. लघू व्यावसायिकांनी कुणाला त्रास होईल, अशा ठिकाणी अतिक्रमण करू नये. जर कुणाची तक्रार असेल, तर ते अतिक्रमण काढले जाईल. ही मोहीम केवळ एका दिवसापुरता नव्हती. अतिक्रमण हटाओची ही मोहीम यापुढे एमआयडीसीत सातत्याने राबविण्यात येणार आहे.- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी अकोला.