अकोटः कोरोना काळात पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना केल्या. मात्र कोरोना संकटात अत्यावश्यक सेवेसोबतच संपर्काचे नेटवर्क जोडणाऱ्या माध्यम म्हणून सोशल मिडियावरील कोरोना वारियर्स ग्रुप अपडेट ठेवत, संकटात कायदा व सुव्यवस्था सोबतच कोरोनापासुन लोकांचे संरक्षण व्हावे, याकरीता अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अनुराधा रामकृष्ण पाटेखेडे ह्या महिला पोलीस अधिकारी कोरोना योध्दा म्हणुन ओळखल्या जात आहेत.
कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस लोकांसाठी काम करणाऱ्या पोलिसांभोवतीच कोरोनाचा विळखा आवळला जात असतांना अनुराधा पाटेखेडे या महिलेने मात्र रात्रंदिवस कर्तव्य बजावले. केवळ कार्यालयीन कामकाज नव्हे तर जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक मोनिका राऊत व अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात उपविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या अकोट शहर आकोट ग्रामीण हिवरखेड, दहीहांडा, तेल्हारा या पाचही पोलीस स्टेशन अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता उपाययोजना केल्या. अनुराधा पाटेखेडे ह्या आधी कृषी खात्यात नौकरी करीत होत्या. पंरतु त्यांना पोलीस खात्यात जायंच होते. पोलीस खात्याची आवड असली तरीमात्र पोलीस खात्यातुन देशाची,शेतकऱ्यांची तसेच सर्वच पातळीवर सर्वसामान्य नागरिकांना न्याय व सेवा करण्याची संधी मिळते. त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर अकोट ग्रामीण सह अनेक पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य पार पाडले. वाहतुक शाखेत सुध्दा त्यांनी उन, पाऊस वारा झेलत सामाजिक उपक्रम राबवित कर्तव्य पार पाडले आहे. अनेक गंभीर गुन्हाचा तपास करीत काही प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. सध्या त्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. महिला समुपदेशन, शाळा, महाविद्यालयात मुलींना कायदेविषयक माहीती कार्यशाळा घेतात. या सोबत पाचही पोलीस स्टेशन च्या कारभाराची शासकीय माहिती अपडेट ठेवण्यापासुन महिला विषयक गुन्ह्यात पोलीस स्टेशन मध्ये सहकार्य करतात. सध्या अकोट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्त आहे. प्रभारी अधिकारी काम पाहत असले तरी मात्र या अनुराधा पाटेखेडे ह्या चोखपणे कर्तव्य पार पाडत आहेत. कोरोना काळात त्याचे कार्य पाहता अनेक संस्थांनी पोलीस विभागातील या प्रसिद्धीपासुन कोसो दुर राहणाऱ्या या एकमेव महिला अधिकारी अनुराधा पाटेखेडे यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान केला आहे.
-------------
‘काेराेना वाॅरियर्स’ची ठरली महत्त्वपूर्ण भूमिका
खास करुन अशा वेळी संकटात सापडलेल्या लोकांची माहीती मिळविणे,त्यांना मदत करण्यासाठी कोरोना वाॅरियर्स (स्वंयसेवक ) तयार केले. त्यांना ओळखपत्र दिली. विशेष म्हणजे कोरोना वाॅरियर्स नावाचा व्हाॅटस्अप ग्रुप तयार केला. या माध्यमातून केवळ मोबाईल वरच न राहता प्रत्यक्ष डोक्यात अन् डोळ्यांदेखत केवळ खाकी अन् कर्तव्य ठेवून रोज घराबाहेर पडत होत्या. कोरोनामुळे आपले सहकारी पोलीस साथ सोडून गेले. पंरतु कुठल्याही क्षणी न डगमगता कोविड रुग्ण, परिस्थिती तसेच वेळेप्रसंगी रुग्णवाहिका पाठवणे, त्या कुंटुबांची आस्थेने विचारपूस करीत मनधैर्य देण्याचे काम केले. आजही त्या आपले कर्तव्य अविरत पार पाडत आहेत.