या प्रकरणाची तक्रार सायबर पाेलीस ठाण्यात हाेताच पाेलिसांनी तातडीने शाेधमाेहीम राबवून ही पाच लाखांची रक्कम परत मिळवून दिली. अकाेला शहरातील एका उच्चशिक्षित व्यक्तीने पैसे ॲपवर ऑनलाइनरीत्या डिपाॅझिट करण्यासाठी सर्च केले. त्यानंतर त्यांना विविध ॲपच्या माध्यमातून पैसे डिपाॅझिट केल्यानंतर जास्त व्याजदर देण्याचे आमिष देण्यात आले. याच आमिषाला बळी पडत या व्यक्तीने एक दाेन हजार नव्हे तर पाच लाखांची रक्कम ऑनलाइन पाठविली. त्यानंतर या ॲपचे अपडेट करण्याच्या नावाखाली आणखी पैशाची मागणी सुुरू करण्यात आली. एवढ्या माेठ्या प्रमाणात रक्कम डिपाॅझिट केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी हाेत असल्याने या व्यक्तीने नॅशनल सायबर काइम पोर्टलवर तक्रार दिली. यावरून अकाेला पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने तपास सुरू करण्याचे निर्देश दिले. सायबर पाेलिसांनी तातडीने तपास सुरू केल्यानंतर ऑनलाइन ॲपद्वारे पळविलेली रक्कम परत मिळवून दिली. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पाेलीस स्टेशनच्या पाेलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर, सहायक पाेलीस निरीक्षक प्रशांत संदे, ओमप्रकाश देशमुख यांनी केली.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कमी वेळात जास्त नफा तसेच अधिक व्याजदर अशा प्रकारच्या माेबाइल किंवा संगणकावर आलेल्या याेजनांना बळी न पडता त्याची संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये. तसेच ऑनलाइन ॲपद्वारे लोन घेत असाल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनेकांची फसवणूक हाेत असल्याने अशा आमिषाला बळी पडू नये़
-जी. श्रीधर,
पाेलीस अधीक्षक, अकाेला