विविध जातींच्या गटात मोडणाऱ्या व्यक्तींसाठी अनुदान तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या योजनेत विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (नवबौद्ध) ७५ टक्के अनुदानावर शेळी पालन, विशेष घटक योजना अनुसूचित जाती ७५ टक्के अनुदानावर शेळी गट वाटप, आदिवासी उपयोजना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व ७५ टक्के अनुदानावर शेळीगट वाटप, सर्वसाधारण लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदानावर सुधारित पैदासीचे बोकड वाटप, गोठ्याकरिता टीनपत्र्याचे शेड बांधकाम योजना, ५० टक्के अनुदानावर २५ माद्या व ३ नर तलंगा गट वाटप योजना, १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप, ९० टक्के अनुदानावर गायी - म्हशीचे दूध काढण्याचे यंत्र वाटप करणे, ९० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना, ९० टक्के अनुदानावर विद्युत चलित कडबा कुटी यंत्र वाटप, १०० टक्के अनुदानावर जिप उपकर योजनेंतर्गत वैरण बियाणे वाटप व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरण बियाणे वाटप करणे इत्यादी योजना असून नागरिकांनी २० फेब्रुवारीपूर्वी उपरोक्त योजनेचा घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. आर. कऱ्हे पंचायत समिती मूर्तिजापूर यांनी केले आहे.
नागरिकांनी पशुसंवर्धन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:17 AM