शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विभागातील ३0७ अप्रशिक्षित शिक्षकांनी भरले ‘डीईएलएड’साठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 1:16 AM

अकोला: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ नुसार राज्यातील शाळांमध्ये ३१ मार्च २0१९ नंतर अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक चालणार नाहीत. त्यामुळे या शाळांमधील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी संसदेने प्रस्ताव पारित करून, ३१ मार्च २0१९ पर्यंत मुदत दिली आहे.

ठळक मुद्देकेवळ राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थानकडून प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ नुसार राज्यातील शाळांमध्ये ३१ मार्च २0१९ नंतर अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक चालणार नाहीत. त्यामुळे या शाळांमधील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी संसदेने प्रस्ताव पारित करून, ३१ मार्च २0१९ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे अमरावती विभागातील ३0७ अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनी डीईएलएडसाठी ऑनलाइन अर्ज भरून राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थानमध्ये प्रवेश निश्‍चित केला आहे.  अप्रशिक्षित शिक्षकांनी आरटीई अँक्टनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये डीएड, बीएड धारक शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करायचे आहे. परंतु, हजारो अप्रशिक्षित शिक्षक शाळांमध्ये शिकविण्याचे काम करतात.  आरटीई अँक्ट लागू झाल्यापासून त्यांना पाच वर्षांच्या आत प्रशिक्षित होणे गरजेचे होते; परंतु अनेक शिक्षकांनी दुर्लक्ष केले. परंतु, आता त्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये आणि त्यांनी प्रशिक्षित व्हावे, यासाठी केंद्र शासनाने त्यांना ३१ मार्च २0१९ पर्यंत डीईएलएड, बीएड पदविका प्राप्त करून देण्यासाठी मुदत दिली आहे. अप्रशिक्षित शिक्षकांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थानच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अमरावती विभागातील ३0७ शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज करून प्रवेश निश्‍चित केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील वैयक्तिक मान्यता दिलेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थान (एआयओएस) योजनेंतर्गत डीएड, बीएड पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. यानंतरही पदविका प्राप्त न करणार्‍या शिक्षकांना यापुढे काम करता येणार नसल्याचे विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी स्पष्ट केले. 

पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्या चार वर्षांत सेवांतर्गत प्रशिक्षित करण्यासाठी पत्राद्वारा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती; परंतु केंद्र शासनाच्या निर्णयानुसार सर्व अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनी केवळ राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थान (एनआयओएस) यांच्यामार्फतच ऑनलाइन डीएलएड, बीएड पदविका प्राप्त करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांसाठी सुरू असलेल्या पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करण्यात येत आहे. मात्र, २0१७ व १८ या शैक्षणिक वर्षासाठी द्वितीय वर्षाला असलेल्या शिक्षकांचे सत्र सुरू राहील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.