शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

महापालिकेच्या उपायुक्तपदी गिता ठाकरे शासनाकडून नियुक्ती आदेश जारी

By आशीष गावंडे | Published: July 26, 2023 5:38 PM

शहरातील प्रलंबित विकास कामे, अनेक याेजना व माेठे प्रकल्प निकाली काढण्यासाठी महापालिकेला सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे.

अकाेला: अमरावती जिल्ह्यातील माेर्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर असलेल्या गिता ठाकरे यांची अकाेला महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील आदेश मंगळवारी नगर विकास विभागाने जारी केला आहे. दरम्यान, मागील वर्षभराच्या कालावधीत मनपात अतिरिक्त आयुक्त पदासह मुख्य लेखा परीक्षक, उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्तपदासाठी शासनाने नियुक्ती आदेश जारी करुनही संबंधित अधिकाऱ्यांनी मनपाकडे पाठ फिरवल्यामुळे गिता ठाकरे यांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील प्रलंबित विकास कामे, अनेक याेजना व माेठे प्रकल्प निकाली काढण्यासाठी महापालिकेला सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. मनपातील रिक्त पदांचा अनुशेष दुर हाेत नसल्यामुळे थातूरमातूरपणे विकास कामे मार्गी लावली जात आहेत. संबंधित कामांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘वाॅच’राहत नसल्यामुळे अतांत्रिक संवर्गातील स्थानिक कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावते. वर्तमानस्थितीत मनपाचे प्रशासकीय कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले आहे. शासनाने नियुक्ती आदेश जारी केल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी मनपात नियुक्त हाेत नसल्याची विचित्र परिस्थिती आहे. दरम्यान, तत्कालीन उपायुक्तांचा पुर्वानुभव लक्षात घेता गिता ठाकरे यांच्या नियुक्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  

अकाेट नगर परिषदेत गाजवला कार्यकाळ

सन २००९च्या कालावधीत गिता ठाकरे अकाेट नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर कार्यरत हाेत्या. त्यावेळी त्यांनी अकाेटमधील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवर थाटलेले अतिक्रमण हटविण्याची माेहीम छेडली हाेती. दरम्यान, २०१८ मध्येही त्या अकाेट नगर परिषदेत नियुक्त असताना प्रशासकीय कामकाजात त्यांनी अनेकांचे पितळ उघडे पाडले हाेते,हे येथे उल्लेखनीय.

 

टॅग्स :Akolaअकोला