अकोला: जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत ९० टक्के अनुदानावर राबविण्यात येत असलेल्या शिलाई मशीन, सायकल व पिको मशीन वाटप योजनेच्या लाभार्थी याद्यांना शुक्रवारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये तीनही योजनांच्या १ हजार ११२ लाभार्थींचा समावेश आहे.
शिलाई मशीन वाटप योजनेंतर्गत ४८८, लेडिज सायकल वाटप योजनेंतर्गत ४६२ आणि पिको मशीन वाटप योजनेंतर्गत १७४ लाभार्थींच्या याद्यांना सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मनिषा बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या या सभेत समिती सदस्य गायत्री कांबे, योगीता रोकडे, रिजवाना परवीन शे. मुक्तार, मीनाक्षी उन्हाळे, लता नितोने, वंदना झळके, उर्मिला डाबेराव, अनसूया राऊत यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) विलास मरसाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.