अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षातील २२८.५२ कोटींच्या उत्पन्नाचे अंदाजपत्रक शुक्रवारी मनपाच्या स्थायी समितीसमोर सादर केले. उत्पन्न व जमाखर्चाची आकडेवारी नमूद करताना प्रशासनाने ८.४२ कोटींच्या शिलकीचा बजेट सादर केला. त्यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करणार असल्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी स्पष्ट केले.महापालिक ा आयुक्त संजय कापडणीस यांनी अवाजवी खर्च व तरतुदींना फाटा देत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ‘रिअॅलिस्टिक’ अर्थसंकल्प सादर करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. आयुक्त कापडणीस यांनी चालू आर्थिक वर्षासाठी २२८.५२ कोटींचे उत्पन्न आणि २२८.०३ कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांच्याकडे सादर केले. जमा व खर्चाच्या एकूण ५३६.४३ कोटींच्या अंदाजपत्रकात स्थायी समिती सदस्यांनी दुरुस्त्या सुचवून त्यानुसार आर्थिक तरतूद करण्याचे नमूद केले असता, आयुक्त कापडणीस यांनी सदस्यांच्या सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्याचे निर्देश दिले. सूचनांचा अंतर्भाव केलेला अर्थसंकल्प महासभेसमोर सादर केला जाणार आहे. सभापती विशाल इंगळे यांनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर प्रशासनाला दुरुस्त्या सुचविल्या. सभेला नगरसेवक बाळ टाले, विनोद मापारी, अनिल गरड, सुनील क्षीरसागर, नगरसेविका मंजूषा शेळके, शारदा खेडकर, नंदा पाटील, उषा विरक यांच्यासह इतर सदस्य, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.हद्दवाढीसाठी विशेष तरतूद करा!स्थायी समिती सदस्य सुनील क्षीरसागर, भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड. धनश्री देव यांनी हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठ्याच्या कामांचा समावेश करण्याची मागणी केली.महिला व बालकल्याणवर ताशेरेमहिला व बालकल्याण समितीने मागील दोन वर्षांपासून गरजू महिलांना विविध योजनांचा लाभ दिला नसल्याचा मुद्दा शिवसेनेच्या मंजूषा शेळके, अॅड. धनश्री देव यांनी लावून धरला. हा विभाग कागदोपत्री कामकाज करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.