मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी विष्णू पन्नालाल पोरवाल वय ३० हा १२ फेब्रुवारी २०२० रोजी चप्पलमध्ये गांजा लपवून कारागृहात प्रवेश करीत असताना कारागृह प्रशासन व सिटी काेतवाली पाेलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार विलास पाटील यांनी त्यास रंगेहाथ अटक केली हाेती़ त्यानंतर आराेपीविरुद्ध सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला़ या प्रकरणाचा तपास ठाणेदार विलास पाटील यांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले़ मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमाेर या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर त्यांनी साक्षीदार तपासले़ आराेपी विष्णू पाेरवाल याच्याविरुद्ध आढळलेल्या ठाेस पुराव्यांच्या आधारे त्यास गांजाची तस्करी केल्याप्रकरणी एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ साेबतच दाेन हजार रुपये दंड ठाेठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे़ या प्रकरणातील आराेपी पाेरवाल यास १७ फेब्रुवारी २०२० राेजीच अटक करण्यात आली असून आराेपी तेव्हापासून कारागृहात आहे़ या प्रकरणाचा तपास सिटी काेतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी केला हाेता़
कारागृहात चप्पलमध्ये गांजा नेणाऱ्या आराेपीस कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:40 AM