जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीने पाेलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार २ ऑक्टोबर २०१७ रमाई आंबेडकर नगरातील रहिवासी शुद्धोधन गवई हा त्रास देत हाेता़ हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी त्याने अल्पवयीन मुलीला दिली हाेती़ त्यामुळे मुलीसाेबत घडत असलेला प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला नाही़ मात्र कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीला विचारणा केली असता तिने आपबीती कथन केली़ त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीसह तातडीने जुने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली़ या तक्रारीवरून जुने शहरचे तत्कालीन ठाणेदार सतीश पाटील यांनी गवई या नराधमाविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम ३५४ (अ), ५०६ व पाॅस्कोे कायद्याच्या कलम ११ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या गंभीर प्रकरणाचा तपास ठाणेदार पाटील यांनी स्वत: करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले़. न्यायालयात दाेन्ही पक्षांच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासल्यानंतर शुद्धोधन गवई हा दोषी आढळल्यानंतर त्याला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ३० हजार रुपयांचा दंडही ठाेठावला़ या गंभीर प्रकरणाचा तपास जुने शहरचे तत्कालीन ठाणेदार सतीष पाटील यांनी केला हाेता़ न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणूण प्रवीण पाटील यांनी, तर सरकार पक्षातर्फे ॲड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहिले़
अशा प्रकारे ठाेठावली शिक्षा
भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ (अ) अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा तसेच कलम ५०६ नुसार दोन वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि पाॅस्को कलम ११ व १२ अन्वये तीन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.