येथे कर्तव्यावर असलेल्या हेमंत तायडे, विनोद चव्हाण हे लोकांशी अरेरावी करतात व नको ते नियम सांगून लाभार्थ्यांची दिशाभूल करतात ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊन सुद्धा लाभार्थी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत नाही. त्यांना परत पाठविण्यात येते व जे लोक यांच्या सोबत आर्थिक देवाण-घेवाण करतात त्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.
ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर व्हॅक्सिन उपलब्ध असून सुद्धा नागरिकांना हेलपाटे घ्यावे लागत आहे संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देऊन नागरिकांना होणारा हा त्रास थांबवावा अशी मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे शहर उपाध्यक्ष राम जोशी यांनी दिला आहे. येथील कर्मचारी हेमंत तायडे व विनोद चव्हाण यांच्यावर कारवाई करावी व लसीकरण विभागातून त्यांची बदली करावी. अशी मागणीही करण्यात आली आहे.