- आशिष गावंडेअकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात जंतुनाशकांची फवारणी सुरू आहे. शहरातील विविध प्रभागात ‘सोडियम हायपोक्लोराइड’ तसेच ग्रामीण भागात ‘पायरेट्रम’ या रसायनाचा वापर केला जात असून, जंतुनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात शासनाने दिलेले निर्देश धाब्यावर बसवित जंतुनाशकांची फवारणी केली जात असून, नगरसेवकांच्या मनमानीसमोर प्रशासन हतबल ठरत असल्याची माहिती आहे.देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहून राज्य सरकारच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आरोग्य यंत्रणेला दिशानिर्देश दिले जात आहेत. यादरम्यान, कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी जिल्हा पातळीवरील आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयित रुग्णांना ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये ठेवल्या जात आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे महापालिका तसेच ग्रामीण भागात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. शहरात फवारणीसाठी अत्याधुनिक मशीनचा वापर केला जात असून, ग्रामीण भागात पंपाद्वारे फवारणी केली जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरात फवारणीसाठी ‘सोडियम हायपोक्लोराइड’चा तसेच ग्रामीण भागात ‘पायरेट्रम’ या रसायनाचा वापर केला जात आहे. या दोन्ही रसायनांचा वापर नेमका कधी आणि कुठे केला पाहिजे, यासंदर्भात महापालिका आणि ग्रामपंचायतींच्या स्तरावर कमालीचा संभ्रम आहे.नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आग्रहीशहरामध्ये नगरसेवक आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्यांकडून जंतुनाशक फवारणीसाठी आग्रह धरल्या जात आहे. आवश्यकता नसताना प्रभागात जंतुनाशकांची फवारणी केली जात असून, या माध्यमातून निव्वळ चमकोगिरी सुरू झाली आहे.मनपाच्या स्तरावरही गोंधळकोरोना बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या परिसरात ‘सोडियम हायपोक्लोराइड’चा वापर करावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शासनाची मार्गदर्शक सूचना प्राप्त असल्याचा दावा करणाºया मनपा प्रशासनाच्या स्तरावर गोंधळ उडाल्याची माहिती आहे.
‘पायरेट्रम’चा वापर डासांकरितापावसाळ्यात किंवा हिवाळ्यात डासांची उत्पत्ती वाढते. त्यावेळी जिल्हा हिवताप विभाग तसेच मनपाकडून धुरळणीसाठी ‘पायरेट्रम’चा वापर केला जातो. कोरोनाच्या धर्तीवर ग्रामीण भागात चक्क फवारणीसाठी तसेच धुरळणीसाठी ‘पायरेट्रम’चा वापर केला जात असल्याची माहिती आहे. चार लीटर डीझलमध्ये ८० एमएल रसायन मिश्रण करून धुरळणी केली जात आहे....तर अपाय होण्याची शक्यताजंतुनाशकाच्या अवाजवी वापरामुळे अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनमानीरीत्या अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास संबंधित महानगरपालिका, नगर परिषद तसेच ग्रामपंचायतने प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्वत: फवारणी करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.