ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक चुरशीची झाली. यात कल्पना ज्ञानेश्वर खर्डे यांचा आठ विरुद्ध नऊ मतांनी विजय झाला. निवडणुकीमध्ये अनेक राजकीय दिग्गजांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
उपसरपंच पदासाठी प्रारंभी ५ सदस्यांनी उमेदवारी दाखल केली होती. कल्पना खर्डे आणि मनोहर पांडुरंग पातूरे यांच्यात चुरशीची लढत झाली. कल्पना खर्डे यांना नऊ मते मिळाली. शिर्ला ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यामुळे या जागेसाठी अर्चना शिंदे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्या अविरोध निवडून आल्या. ग्रामपंचायत शिर्लाची सदस्य संख्या १७ असून ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये पातूर नगरपरिषदेचा मोठ्या प्रमाणात भौगोलिक भाग समाविष्ट झाला आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेना ४, राष्ट्रवादी ३, वंचित आघाडी २ अशा एकूण नऊ सदस्यांनी एकत्रित येऊन विकास आघाडी स्थापन केली होती. बहुमताच्या बळावर या गटाने ग्रामपंचायत काबीज केली. शिवसेनेचे अजय ढोणे राष्ट्रवादीचे हिदायत खान, सुनील गाडगे, परशराम उंबरकर, रामदास बंड, जयाजी खर्डे ,संतोष राऊत ,अंबादास देवकर,निमंकडे,सचिन इंगळे यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
फोटो: