भरदिवसा घरात घडलेल्या घटनेत पोलिसांनी प्रारंभी ३९४,४५२,५०६,३४ कलमान्वे घरात घुसणे, जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला, परंतु आरोपीची संख्या पाचपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाल्याने दरोड्याची भादंविचे ३९५ कलमाची गुन्ह्यात वाढ करण्यात आली, तर आरोपीची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
झटपट श्रीमंत होण्याचा नादात दरोडा!
आरोपी महिला वैशाली टवरेही स्वयंपाकाला जाते, ब्युटीपार्लरही चालविते, तर पतीने नुकतीच चार व दुचाकी गाडी घेतली असल्याची माहिती पुढे येत आहे. ठाकरे बंधू खासगी गाडीवर चालक आहेत. त्याची पत्नी गृहिणी असून, सीमा निंबोकार खासगी दवाखान्यात काम करते. दरम्यान, आरोपींनी झटपट श्रीमंत होण्याचा नादात दरोडा टाकला असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
---------------
घर परिसरात येणाऱ्या अनोळखी लोकांपासून सावध राहावे, व्यापारी व नागरिकांनी शक्य झाल्यास, सीसी कॅमेरे सुरक्षितता दृष्टीने लावावी, संशयास्पद व्यक्ती, प्रकार आढळल्यास कळवावे, या घटनेतील आरोपींचा अजूनही काही गुन्ह्यांत सहभाग आहे या दृष्टीने पोलीस विभाग तपास करीत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
- प्रकाश अहिरे, शहर पोलीस निरीक्षक अकोट.