शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सेना पाचही नगरपालिका स्वबळावर लढणार!

By admin | Published: November 06, 2016 2:11 AM

शिवसेना-भाजपची युती होण्याची आशा मावळल्याने शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली.

अकोला,दि. ५-स्थानिक नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी शिवसेना सज्ज असून यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होण्याची आशा मावळल्याने शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली. सेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शिवसेनेचे पश्‍चिम विदर्भ संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी सेनेच्या जिल्हा तसेच शहर कार्यकारिणीत फेरबदल करून नवीन कार्यकारिणीचे गठन केले. जिल्हाप्रमुखपदी नितीन देशमुख व इतर पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्यानंतर जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने पहिल्यांदाच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती असली तरी भाजपच्या दिरंगाईमुळे जिल्हापातळीवर युतीची घोषणा होण्यास विलंब झाला. तोपर्यंत इच्छुक उमेदवारांना ह्यएबीह्णफॉर्मचे वाटप झाले होते. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील पाच नगरपालिकांची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याची माहिती आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली. शिवसेनेची पाळेमुळे जिल्हय़ात खोलवर रुजली असून आम्ही प्रत्येक नगरपालिकेत स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. युती करण्यासाठी शिवसेनेकडून कोणतीही अडचण नव्हती. त्यामुळे युतीसाठी कोणी झुलवत ठेवले, याची सर्वांना जाण आहे. यंदा नगरपालिका निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सेनेचे माजी आमदार संजय गावंडे, सहायक संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, अकोला पूर्वचे उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार, बाळापूर-पातूरचे रवींद्र पोहरे, अकोट-तेल्हारा तालुक्याचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, महिला संघटिका ज्योत्स्ना चोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बाश्रीटाकळी तालुका प्रमुख गजानन मानतकर, मूर्तिजापूर-अप्पू तिडके, विनायकराव गुल्हाने, तेल्हारा-विजय मोहोड, संतोष अनासने, अकोला पूर्वचे शहर प्रमुख अतुल पवनीकर, प्रदीप गुरुखुद्दे, गजानन बोराळे, सुनीता मेटांगे आदी उपस्थित होते.पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी युती नाही!नगरपालिका निवडणुकीसाठी युती फिस्कटली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती होणार किंवा नाही, याबद्दल पक्षश्रेष्ठींकडून अद्यापपर्यंत कोणताही आदेश मिळाला नाही. सेनेकडूनही पदवीधरची निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी सांगितले. यापूर्वी पाच नगरपालिकांमध्ये सेनेचे केवळ तीन नगरसेवक होते. यंदा नगरसेवकांच्या संख्येत निश्‍चित वाढ होण्याचा विश्‍वास देशमुख यांनी व्यक्त केला. दगाबाजी झाली!जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेची मजबूत पकड आहे. त्याचा काही राजकीय पक्षांनी स्वार्थापुरता वापर केला आणि नंतर दगाबाजी केली. केंद्रात किंवा राज्यात कोणतीही लाट येवो, सुनामी फार काळ टिकत नसल्याचे माजी आ. संजय गावंडे यांनी सांगितले.वाघ शेवटी वाघच असतो!शिवसेनेचा ढाण्या वाघ कसा आहे, हे सांगण्याची गरज नाही. जंगलातील किंवा जंगलाच्या बाहेरचे किती वाघ कमी झाले, याची मोजदाद करण्यापेक्षा वाघ शेवटी वाघच असतो, असा टोला आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता लगावला.