विजय शिंदे
अकोटःएमएच सीईटी परीक्षेच्या सोमवार, दि.१२ जून रोजी निकाल जाहीर झाला असून, त्यामध्ये शहरातील अर्पण संदीप कासट हा खुल्या प्रवर्गात राज्यात प्रथम आला आहे. त्याला १०० टक्के गूण मिळाले आहेत. त्याने निटचीसुध्दा परिक्षा दिली असून, वैद्यकीय क्षेत्रात जायचे असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले.
अकोट येथील बालरोगतज्ज्ञ संदीप कासट व दंत रोगतज्ज्ञ रुपाली कासट यांचा अर्पण हा मुलगा आहे. त्यांची बहीण अर्पिता एमबीबीएसला शिकत आहे. अर्पणने अकोटच्या बाबू जगजिवनराम विद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याला वैद्यकीय क्षेत्रात भरारी द्यायची असल्याने कोटा येथे शिकवणी वर्ग लावले असून, निटची परीक्षा दिली आहे. दरम्यान इतरही परीक्षा दिल्या असून जेईच्या मुख्य परिक्षेत ९९.७८ टक्के मिळाले आहेत. अर्पण कासट याने सीईटीची सुध्दा परिक्षा दिली होती. दरम्यान सीईटीच्या निकालात तो राज्यातून प्रथम आला. त्यांचा निकाल लागताच आईवडीलांनी त्याला पेढे खाऊ घालत आनंद व्यक्त केला आहे.त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात अकोटचा नावलौकिक वाढला आहे.
गोरगरीब रुग्णांची करायची आहे आरोग्य सेवा
वैद्यकीय क्षेत्रात जात गोरगरिबांची आरोग्य सेवा करायची असल्याने निट परिक्षाकरीता कोटा येथे त्याने क्लास लावले होते. दरम्यान एमएच सीईटी ही महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची समजली जाते. त्यामुळे एमएच सीईटीकरीता परीक्षा अर्ज भरण्याचे शेवटच्या दिवसाच्या एक तास आधी ठरवले, आणि लेट फी देत सीईटी परिक्षेकरीता अर्ज भरला होता.
दररोज चार तास अभ्यास अन् यशाला गवसणीनीटच्या परीक्षेसाठी त्याने दररोज चार तास अभ्यास केला. शिवाय त्याने एमएच सीईटी पीसीबी ग्रुपची परीक्षा द्यायचे ठरवले होते. क्लास नसतानाही तो अभ्यास करीत होतो. त्यामुळे निटसोबतच त्याने सीईटी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. या परीक्षेत त्याला ९९ टक्के गूण मिळतील अशी आशा होती. पंरतु राज्यात प्रथम येणार याची अपेक्षा नव्हती, अशी प्रामाणिकपणे कबुली अर्पण कासट यांने दिली. त्याने यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले.