शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

रेल्वे, बस स्थानकावर प्रवाशांच्या हात धुण्याची व्यवस्था करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 2:16 PM

बसस्थानकांवर प्रवाशांचे हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी.

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील रेल्वे स्थानक राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक व खासगी लक्झरी बसस्थानकांवर प्रवाशांच्या हात धुण्याची व्यवस्था करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी संबंधित यंत्रणांना दिला.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, खासगी लक्झरी बसस्थानक व अकोला शहर बस सेवा अंतर्गत बसस्थानकांवर प्रवाशांचे हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. बसमध्ये येणारे प्रवासी बसमधून उतरल्यानंतर हात हात धुऊन बाहेर जातील आणि हात धुतल्यानंतर प्रवासी गाडीमध्ये चढतील यासंदर्भात उपाययोजना करण्यासह प्रवाशांना कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृतीचे पत्रक देण्यात यावे तसेच जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर प्रवासी उतरल्यानंतर प्रत्येक फलाटावर प्रवाशांच्या हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी व प्रवाशांच्या जनजागृतीसाठी रेल्वे स्थानकारवर फ्लेक्स बोर्ड लावण्यात लावण्यात यावे, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.बसेस, रेल्वे स्थानकाचे निर्जंतुकीकरण करा!सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे आणि दररोज बसेस स्वच्छ करण्यात याव्या. तसेच रेल्वे स्थानकाचे निर्जंतुकीकरण करून स्वच्छता राखण्याची दक्षता घेण्यात यावी, असा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, खासगी लक्झरी बसस्थानक, मनपा आयुक्त व रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांना दिला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या