हिवरखेड : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अकोल्यासह बुलडाणावासीयांसाठी उपयोगाचे असलेल्या वान धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची उचल होत असल्याने सिंचनाचा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंचनासाठी पाइपलाइनची व्यवस्था करावी व धरणातील गाढ, बाष्पीभवन, पाण्याचा अपव्यय, कर्मचाऱ्यांची कमतरता, याकडे लक्ष देण्याची मागणी लोकजागर मंच, आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी केली आहे.
विविध योजनेसह तेल्हारा-अकोट मतदारसंघातील १५९ खेडी योजना धरणाच्या पाण्यातून प्रस्तावित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेच्या व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते. त्यामुळे धरणाचवरील सिंचनाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचत आहे. वान धरणावर १२८ पैकी केवळ २० कर्मचारी काम पाहत आहेत. यामुळे सिंचनाकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. नादुरुस्त कालव्यांमधून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे शासनाने अगोदर सिंचनाबाबत पाइपलाइनची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. वानप्रकल्प पाणी वापर संस्थांचे पुनर्गठण जुन्या नव्या शेतकऱ्यांना घेऊन नियोजन करावे, धरण निर्मितीपासून धरणातील गाळ काढला नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बाळापूरच्या पिण्याचे पाण्याचा प्रस्ताव रद्द करून अकोट मतदारसंघाबाहेर जाता कामा नये, अशी रोखठोक भूमिका लोकजागर मंच, आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी माडली आहे. (पासपोर्ट फोटो) ८ बाय ५ (वा.प्र.)