अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडलाअंतर्गत अकोला,बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्थराज्य संस्थांकडे पथदिव्याचे ३९५ कोटी आणि पाणी पुरवठा योजनांचे ९२ कोटी अशी एकूण ४८७ रूपयाची थकबाकी आहे. महावितरणकडून थकित देयके भरण्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे, परंतू पाठपुरवा करूनही प्रतिसादच मिळत नसल्याने नाईलाजास्तव महावितरणला वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे. महावितरणची सध्याची आर्थीक स्थिती बिकट असल्याने वसूली मोहिम उघडण्यात आली आहे. आर्थीक वर्षाचा शेवटचा आठवडाच महावितरणकडे शिल्लक आहे. बिल नाही तर वीज नाही हीच भूमिका महावितरणने घेतली असल्याने अकोला जिल्ह्यातील ८४ कोटी रूपयाच्या थकित बिलासाठी १२६८ पथदिव्यांचा आणि १५ कोटी रूपयाच्या थकबाकीसाठी ७९७ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील २२५ कोटीसाठी १७१२ पथदिव्यांच्या वीज जोडणी व ६६ कोटीची वीज देयके थकल्याने १४०५ पाणी पुरवठा योजना महावितरणच्या रडारवर आहे. वाशिम जिल्ह्यातही ८६ कोटी वीजबिलाच्या थकबाकीसाठी पथदिव्याचे ८४१ कनेक्शन आणि ११ कोटीच्या थकित बिलासाठी ४४६ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा हा केंव्हाही खंडित होऊ शकतो. याबाबतच्या नोटीस संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
पथदिवे, पाणी पुरवठा योजनांची थकबाकी ४८७ कोटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 15:33 IST
MSEDCL NEWS पथदिव्याचे ३९५ कोटी आणि पाणी पुरवठा योजनांचे ९२ कोटी अशी एकूण ४८७ रूपयाची थकबाकी आहे
पथदिवे, पाणी पुरवठा योजनांची थकबाकी ४८७ कोटीवर
ठळक मुद्देअकोला परिमंडळातील वस्तुस्थिती वीज पुरवठा केव्हाही होऊ शकतो खंडीत