लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस दुचाकी चाेरीच्या प्रमाणात वाढ हाेत असल्याचे दिसून येते. जानेवारी ते नाेव्हेंबर २०२०पर्यंत ३६०पेक्षा जास्त दुचाकींची चाेरी झाली आहे. या दुचाकींचा शाेध घेताना पाेलिसांनी १२ चाेरट्यांच्या टाेळ्या जेरबंद करून त्यांच्याकडून २३०पेक्षा जास्त दुचाकी जप्त करून त्या दुचाकी संबंधित मालकांना न्यायालयाच्या आदेशावरून परत केल्या.
दुचाकी चाेरी केल्यानंतर या चाेरट्यांनी दुचाकी विकल्या नाही गेली तर त्यांचे पार्ट वेगळे करून विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती पाेलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यातही चाेरीच्या दुचाकी विक्री केल्याची माहिती समोर आली आहे, तर काहींनी पैशाची अडचण दाखवून गाडी तुमच्याकडे ठेवा म्हणून १० ते १५ हजार रुपयांमध्ये अनेकांना दुचाकी विकल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. चाेरट्यांकडून जप्त करण्यात आलेली वाहने पाेलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आली असून, मूळमालकांचा शाेध घेऊन त्यांना ती परत करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. ज्या वाहनांच्या मालकांचा शाेध लागला नाही त्यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.
.............
दुचाकी चाेरट्यांवर पायबंद घालण्यासाठी पाेलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. या वर्षभरात जवळपास दुचाकी चाेरी करणारी १२ टाेळी पकडण्यात आली आहे. त्याशिवाय चाेरी, दराेडा प्रकरणांतील ३०पेक्षा अधिक गुन्ह्यातील आराेपींना पिस्टलसह अटक केली. १० ते १२ भुरट्या दुचाकी चाेरांनाही पकडले आहे.
- शैलेश सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख, अकाेला
...........
पार्ट काढून केली जाते विक्री
चाेरीच्या गाडीचे पार्ट, नंबरप्लेट बदलून जिल्ह्यातच विक्री केली जाते. किंवा लगतच्या जिल्ह्यात नेऊन वाहने विकली जातात. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातच चाेरीच्या दुचाकी विक्री करणाऱ्या टाेळीला जेरबंद करण्यात आले हाेते. त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणात दुचाकी चाेरी केल्याचे उघडकीस आले हाेते.
८६पेक्षा अधिक चोरटे पकडले
दुचाकी विक्री करणाऱ्या १२ टाेळ्या व १० ते १२ भुरटे चाेर असे जवळपास ८६ पेक्षा अधिक दुचाकी चाेरट्यांना पाेलिसांनी पकडले. त्यांच्याकडून वाहनेही जप्त करण्यात आली, तर काही वाहनांचे मालक समाेर येत नसल्याने ही वाहने सध्या पाेलीस ठाण्यांमध्ये पडून आहेत.