बाश्रीटाकळी (अकोला): कान्हेरी सरप येथील वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्रातील अपघातप्रकरणी पोलिसांनी येथील व्यवस्थापक मेहर कुमार याला आज ९ जून रोजी अटक केली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथील वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्रावर कुटुंबीयांसह आलेल्या निशांत चोपडे (१४ ) या बालकाचा ८ जून रोजी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. यानंतर मृतक निशांतचे मामा अरुण सरोदे यांनी आज ९ जून रोजी बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात पर्यटन केंद्राचे संचालक प्रकाश पोहरे व येथील व्यवस्थापक मेहर कुमार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ३0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पीएसआय पठाण करीत आहेत.
वेदनंदिनी अपघातप्रकरणी व्यवस्थापकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 2:20 AM