अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात असलेल्या सिद्धार्थवाडी व संजयनगर येथे हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणा-या एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीस दहशतवादविरोधी कक्षाने सोमवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे.
नायगाव येथील रहिवासी शेख जब्बार शेख सत्तार ५४ वर्ष हा अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय नगर व सिद्धार्थवाडी परिसरात हातात तलवार घेऊन नागरिकांना धमकावत असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. पाटील यांनी पथकासह तातडीने धाव घेऊन युवकास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता प्रचंड दारू पिलेला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने अटक करून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कला आहे. ही कारवाई दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.