लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शक्ती आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र उत्सवाला महत्त्व आहे. अशा या नवरात्रोत्सवात आदिशक्ती..आदिमायेची ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिपूर्ण वातावरणात घरोघरी घटस्थापना करण्यात आली. अश्विन महिन्यात येत असलेल्या या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र, असेही म्हणतात. या चैतन्यमय उत्सवाचा प्रारंभ म्हणून बहुसंख्य भाविकांनी घरोघरी कुळाचाराप्रमाणे घटस्थापना केली. शहरातील सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाच्यावतीनेसुद्धा ढोल-ताशांच्या निनादात शनिवारी आदिशक्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंंत शहरात देवीच्या मूर्तीची मंडळाच्यावतीने स्थापना सुरूच होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आदिशक्तीचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:38 AM
अकोला: आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शक्ती आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र उत्सवाला महत्त्व आहे. अशा या नवरात्रोत्सवात आदिशक्ती..आदिमायेची ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिपूर्ण वातावरणात घरोघरी घटस्थापना करण्यात आली.
ठळक मुद्देबाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी