- राजरत्न सिरसाट
लाेकमत न्यूज नेटवर्कअकोला : लाेकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंगळवारी १२.३० वाजता अकाेल्याच्या शिवनी विमानतळावर आगमन झाले असून, येथे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते. येथून ते रिधाेरानजीकच्या हाॅटेलमधील बैठकीसाठी रवाना झाले.यादरम्यान, निवडक आठ ठिकाणी कार्यकर्त्यांकडून स्वागत केले गेले.दरम्यान, मंगळवारी अकाेल्यानंतर दुपारी जळगाव त्यानंतर सांयकाळी छत्रपती संभाजी नगर येथे जाहीर सभा असा त्यांचा महाराष्ट्रव्यापी दाैरा असल्याने आचारसंहितेपुर्वी लाेकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगूल फुंकला जाणार आहे.
अकाेला येथील रिधाेरा येथील हाॅटेलमध्ये पश्चिम विदर्भातील पाच व पूर्व विदर्भातील एक अशा एकूण सहा लाेकसभा मतदारसंघाचा केंद्रीय गृहमंत्री शाह आढावा घेणार आहेत. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री तथा पालकमंत्री डाॅ. राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार रामदास तडस, अनिल बोंडे यांच्यासह सहा जिल्ह्यातील खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.शिवणी विमानतळाहून निघाल्यानंतर ते प्रथम शिवणी येथील डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.पश्चिम विदर्भातील अकाेला, बुलढाणा, वाशिम, अमरावती व वर्धा, तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर अशा एकूण सहा लाेकसभा मतदारसंघाचा आढावा ते घेत आहेत. अकाेला लाेकसभा मतदार संघातील भाजपा खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांची प्रकृती अस्वास्था्मुळे त्यांच्या जागी काेण उमेदवार असेल याची अद्याप स्पष्टता नाही.बुलढाण्याची जागा शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव व वाशिम -यवतमाळची जागा खासदार भावना गवळी यांच्याकडे असली तरी या दाेन्ही ठिकाणी यावेळी भाजपाने निवडणूक लढवावी असा मतप्रवाह असल्याने महायुती अंतर्गत या जागा नेमक्या काेणाला साेडल्या जातात याचा निर्णय अगर चर्चा हाेणे या बैठकीत अपेक्षित आहे. यामुळे या दाेन्ही जिल्ह्यातील भाजपा- शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवणी येथे डाॅ. बाबासाहेब आबेडकर पुतळ्यास अभिवादन
शाह यांनी शिवणी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवदन केले. यावेळी अनुसूचित जाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष श्रावण इंगळे, माजी नगरसेवक विशाल विशाल इंगळे,माजी नगरसेवक प्रवीण जगताप, दिपाली प्रवीण जगताप यांची उपस्थिती हाेती.या दाैऱ्यात ठिकठिकाणी अमित शाह यांचे स्वागत भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर , आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी राज्यमंत्री डाॅ़ रणजित पाटील,जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, तेजराव थोरात, माजी महापाैर विजय अग्रवाल, अॅड नकुल देशमुख, अॅड विजय जाधव, जयंत मसने, हरिश अलिमचंदाणी, अनुप धाेत्रे व लोकप्रतिनिधी यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.दरम्यान, या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्यादृष्टीने शिवसेना ठाकरे गटाच्या नेते, पदाधिकाऱ्यांची धरपकड पाेलिसांकडून करण्यात आली.