अतुल जयस्वाल / अकोलातरुण वयात अनेकांना अभिनय करण्याची हौस असते. मात्र, योग्य व्यासपीठ व प्रशिक्षण मिळत नसल्याने अनेकांची ही इच्छा तशीच राहते. अशा हौशी कलावंतांना नाटकाशी संबंधित सर्व बाबींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कलावंताला नवीन उभारी देण्यासाठी डॉ. सुनील गजरे यांनी ‘नाट्यकट्टा’ हा उपक्रम सुरू केला आहे. १३ जून २०१६ रोजी ‘नाट्यकट्टा’ उपक्रम त्यांनी सुरू केला. दर रविवारी येथील आयुर्वेद महाविद्यालयातील सभागृहात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हा कट्टा भरतो. या ठिकाणी कट्ट्यातील सदस्यांना नाटकाशी संबंधित पटकथा, कथालेखन, कथा-कथन, अभिनय, संवाद अशा सर्व बाबींचे शास्त्रोक्त धडे दिले जातात. यासाठी डॉ. गजरे यांनी एक अभ्यासक्रमच तयार केला आहे. विद्यार्थ्यांना आधी नाटकाचे धडे दिले जातात व नंतर त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करवून घेतले जाते. या कामात डॉ. गजरे यांना ज्येष्ठ रंगकर्मी मधू जाधव, अशोक ढेरे, बाळू उखळकर, विजय देशमुख, अनिल कुळकणी, जयश्री देशमुख, मानसी देशमुख यांचे सहकार्य लाभत आहे.
‘नाट्यकट्टा’ देतोय कलावंतांना उभारी!
By admin | Published: February 13, 2017 3:56 AM