-संजय उमकमूर्तिजापूर : तब्बल १०५ दिवस उलटूनही एस.टी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. संप काळात कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने राज्य परिवहन महामंडळावर एस.टी चे स्टेअरिंग खासगी चालकाच्या हातात देण्याची वेळ आल्याने प्रवाशांच्या जीवशी खेळ चालू असल्याचे चित्र आहे. संप काळात या आगारातून २९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. येथील आगारात १९ बसेस आहेत परंतु चालक- वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांनी ४ नोव्हेंबर पासून राज्य सरकार मध्ये विलगीकरण करण्यासाठी संप पुकारल्याने १०५ दिवसांच्या कालावधी नंतर १९ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. या आगारात १२१ कर्मचारी होते पैकी २९ जणांवर कारवाईचा बडगा उगारुन त्यातील १४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ तर १५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित ८८ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या आगारात एकूण १९ बसेस आहेत १५ साधारण तर ४ सेमी लक्झरी (एशियाड) आहेत परंतु यापैकी केवळ ५ बसेस रस्त्यावर धावत आहेत पैकी चार अमरावती - अकोला तर एक कारंजा फेरी करीत आहे यामुळे आगाराला ४० हजार रुपये रोज कलेक्शन होत असले तरी दर्यापूर मार्ग हा परतवाडा, अंजनगावसुर्जी व अकोला जोडणारा असल्याने यामार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते तरी सुध्दा या मार्गावर बस नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. मूर्तिजापूर - अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्गावर इतर आगारातील बसेस धावत असल्याने मूर्तिजापूर आगाराने इतर मार्गाने बसोस सोडण्याची मागणी होत आहे. या आगारात १९ वाहने असताना रस्यावर केवळ ५ बसेस धावत असल्याने आगारात १४ बसेस उभ्याच आहेत. प्रवाशांच्या जीवशी खेळ
या आगारात दोन खासगी चालक एक १ फेब्रुवारी पासून कामावर दाखल झाले आहेत. एक मूर्तिजापूर आगारात कायम कार्यरत आहे तर एक कारंजा मूर्तिजापूर आगारात आळीपाळीने काम करतो, परंतु या खासगी चालकाच्या हातात एस.टी.चे स्टेअरिंग दिल्याने खरं तर हा प्रवाशांच्या जीवनाशी खेळ असल्याचे बोलल्या जाते नियमानुसार सर्वच चालकांना ४८ दिवसांचे चालक प्रशिक्षण पुर्ण करणे गरजेचे आहे पंरतु या चालकांना केवळ १५ दिवसांचे प्रशिक्षण दिल्या गेल्याची माहिती आहे. संपकरी म्हणता...... आगाराबाहेर मंडप लावून आजही संपकरी कर्मचारी संप करीत आहेत. आमच्या पगाराची हमी नाही, न्यालयाने समिती स्थापन करुन १२ आठवड्यात अहवाल सादर करण्याचा कालावधी दिला होता परंतु त्या अहवालावर चर्चा नाही, आतापर्यंत केवळ पगारासाठी ८९ लोकांनी आपला जीव गमावला आहे, एसटी प्रशासनाने कोरोना काळातील ३ महिन्यांचा पगार थांबल्याने २ दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, शासनाने राज्य सरकार मध्ये विलणीकर करावे हिच आमची मुख्य मागणी आहे. यासाठीच ४ नोव्हेंबर पासून संप सुरू आहे. या आगारात १९ बसेस उपलब्ध आहेत, कर्मचाऱ्या अभावी केवळ ५ बसेस रस्त्यावर धावत आहेत. याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे. आतापर्यंत १९ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यापूर्वी २९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.-अनिल माणके, प्रभारी आगार प्रमुख, मूर्तिजापूर