यावेळी भाजप अकोला जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण बाबू देशमुख, सरपंच अतुल वाठ, सर्कलप्रमुख संतोष शिरभाते, तालुका उपाध्यक्ष गजानन ढोरे, पोलीस पाटील वसंतराव विरुळकर, अनंता विरुळकर, सुशील खंडारे यांच्या हस्ते कुरुम, मधापुरी, माटोडा येथील कोरोना काळात अविरत सेवा देत असलेल्या आशा स्वयंसेविका सुनीता शिरभाते, सुवर्णा देशमुख, सूर्यकांता वऱ्हेकर, कल्पना गावंडे, शारदा धामणकर, उर्मिला वासनिक, रेखा मालधुरे, दीपाली सगळे, शाहिस्ता बानो, गटप्रवर्तक अनिता घारपवार, ज्योती उभयकर यांचा साडी-चोळी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय घाटे यांनी तर प्रमुख मार्गदर्शन भाजप अकोला जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण बाबुभाऊ देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी केले. याप्रसंगी भाजप कार्यकर्ते राजू दावेदार, दिलीप सगळे, सुधीर वाढे, ज्ञानेश्वर डोंगरे, प्रा. आ.केंद्राचे कर्मचारी आरोग्यसेवक नागराज पटले, परिचर नीलेश बायस्कर आदी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन साथरोग अधिकारी संजय घाटे यांनी तर आभार कुष्ठरोग तंत्रज्ञ मोहन सहारे यांनी मानले. (फोटो)
आशा स्वयंसेविकांचा साडी-चोळी देऊन गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:14 AM