शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
3
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
4
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
5
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
6
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
7
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
8
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
9
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
10
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
11
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
12
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
13
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
14
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
16
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
17
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
18
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
19
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
20
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

तोकड्या मानधनात ‘आशा’ बिनपगारी-फुल अधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:22 PM

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना कामाच्या मोबदल्यात दरमहा मिळणारे तोकडे मानधन बघता, बिनपगारी अन् फुल अधिकारी अशीच अवस्था आशा स्वयंसेविकांची झाल्याचा प्रत्यय येत आहे.

- संतोष येलकरअकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना कामाच्या मोबदल्यात दरमहा मिळणारे तोकडे मानधन बघता, बिनपगारी अन् फुल अधिकारी अशीच अवस्था आशा स्वयंसेविकांची झाल्याचा प्रत्यय येत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची ग्रामीण आणि शहरी भागात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात आशा स्वयंसेविकांची मदत महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात कार्यरत आशा स्वयंसेविकांना जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन साधनांचे वाटप, हिवताप समूळ उपचार, कुष्ठरोग औषधोपचार, क्षयरोग औषधोपचार, विविध प्रकारचे लसीकरण आणि सर्वेक्षणासह ४८ प्रकारची कामे करावी लागतात. काम भरपूर करावे लागत असले, तरी कामाच्या मोबदल्यात दरमहा ५०० रुपये मानधन आणि विविध भत्त्यांसह १ हजार ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत एकूण मानधन मिळते. आरोग्यविषयक कामांसाठी पायपीट करणाºया आशा स्वयंसेविकांना दरमहा मिळणाºया तोकड्या मानधनात संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. त्यामुळे तुटपुंजा मानधनात आशा स्वयंसेविकांची गत बिनपगारी आणि फुल अधिकारी अशीच झाल्याचा प्रत्यय येत आहे.जिल्ह्यात कार्यरत अशा आहेत ‘आशा’!जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामीण भागात १ हजार २७५ आणि अकोला महानगरपालिका क्षेत्रात १८० अशा जिल्ह्यात एकूण १ हजार ४५५ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत.असे मिळते मानधन!आशा स्वयंसेविकांना दरमहा निश्चित स्वरूपात ५०० रुपये मानधन, रेकॉर्ड मेंटनन्स ५०० रुपये, बचत गटांची बैठक घेतल्यास ४० रुपये, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केल्यास ४० रुपये, महिलांची बैठक घेऊन मार्गदर्शन केल्यास ४० रुपये, ग्रामसभेला उपस्थित राहुल आरोग्यविषयक मार्गदर्शन केल्यास ५० रुपये अशा प्रकारचे मानधन आशा स्वयंसेविकांना दिले जाते.मीठ वापराच्या तपासणीसाठी प्रतिघर एक रुपया!गावात घरोघरी फिरून आयोडीनयुक्त मीठ वापरासंदर्भात तपासणी केल्यास आशा स्वयंसेविकांना प्रतिघर एक रुपया याप्रमाणे मानधन देण्यात येत आहे.शेतमजुरीचे करावे लागते काम!आशा स्वयंसेविकांना कामाच्या मोबदल्यात दरमहा मिळणारे मानधन अत्यंत तोकडे असल्याने, संसाराचा गाडा चालविण्यासाठी अनेकदा आशा स्वयंसेविकांना शेतमजुरीचे काम करावे लागते.तोकड्या मानधनात ‘आशा’ बिनपगारी फुल अधिकारी!राबराब राबून कामाचा मिळणारा मोबदला अत्यंत कमी मिळतो. दरमहा १ हजार ५०० ते २ हजार रुपये मानधन मिळते. त्यामध्ये संसाराचा गाडा चालविणे शक्य नसल्याने, आशा स्वयंसेविकेचे काम करून शेतमजुरीचे काम करावे लागते. त्यामुळे बिनपगारी आणि फुल अधिकारी अशी आमची अवस्था आहे.-प्रमिला गजानन डाबेरावआशा स्वयंसेविका, जऊळखेड, ता. अकोट.पाच हजार लोकसंख्येच्या क्षेत्रात एका आशा स्वयंसेविकेला काम करावे लागते; मात्र कामाच्या मोबदल्यापोटी अत्यंत कमी मानधन मिळत आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना दरमहा किमान ५ हजार रुपये वेतन आणि मोबाइल भत्ता, स्टेशनरी खर्च मिळाला पाहिजे. सर्वेक्षणाच्या कालावधीत आशा वर्करसाठी संरक्षणाची उपाययोजना करणे गरजेचे आहे.-अपर्णा अशोक भातकुलेआशा स्वयंसेविका, नागरी आरोग्य केंद्र नायगाव, अकोला.समाज आणि आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा म्हणून आशा स्वयंसेविका काम करतात; परंतु त्यांना कामाचा मिळणारा मोबदला अत्यंता तुटपुंजा आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना दरमहा किमान पाच हजार रुपये वेतन व आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजे.-प्रतिभा अवचारसंस्थापक अध्यक्ष, क्रांती आशा फाउंडेशन, अकोला. 

 

टॅग्स :Akolaअकोला