बार्शीटाकळी : तालुक्यातील साखरवीरा येथील गावठाणच्या साडेसात एकर जमिनीवर जनता ज्ञानोपासक मंडळ, लोहगड द्वारा संचालित विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रम शाळा व वसराम नाईक आडे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा साखरवीराच्या इमारतीचे अतिक्रमण काढण्याचा आदेश तहसीलदार बार्शिटाकळी यांनी १८ जून २०२१ रोजी पारित केला आहे.
तक्रारकर्ते अविनाश किसन राठोड रा बार्शिटाकळी यांनी तहसीलदार बार्शिटाकळी यांच्याकडे तक्रार दिली की, माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नी सुमन मखराम पवार यांनी साखरविरा येथील साडेसात एकर गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून २४ वर्गखोल्या , दोन कार्यालये, १२ बाथरूम, १२ स्वच्छालये व एक स्वयंपाक खोली अशी एकूण ५१ खोल्या असलेली भव्य इमारत उभारून, परिसराला तार कुंपण करून त्यामध्ये जनता ज्ञानोपासक मंडळ, लोहगड यांच्याद्वारा संचालित विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रम शाळा व वसराम नाईक आडे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा साखरविरा चालवित आहेत.
तहसीलदारांचे बीडीओंना निर्देश
तहसिदार बार्शिटाकळी यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बार्शीटाकळी यांना अर्जदाराच्या तक्रारीनुसार साखरविरा येथील साडेसात एकर गावठाण जमिनीवर भव्य इमारत बांधकाम व तारेचे कुंपण घालून सुमन मखराम पवार यांनी गैरकायदेशीर अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमण तात्काळ काढून कायदेशीर कारवाई करावी व अतिक्रमन केव्हापासून करण्यात आले, यांची सखोल चौकशी करून अतिक्रमण काढण्याची कारवाई व सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.