अकोला: विमुक्त जाती-भटक्या जमाती आश्रमशाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन होईपर्यंत 'काम नाही वेतन नाही' धोरण लागू करण्याचा शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघ जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे जिल्हा सचिव सचिन रहाटे यांनी बेमुदत उपोषण तर संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारी आणि कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उ पोषण सुरू केले. साखळी उपोषणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार खेतकर, विजय चतुरकार व इतर पदाधिकार्यांसह आश्रमशाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
आश्रमशाळा शिक्षकांचे उपोषण
By admin | Published: May 03, 2016 2:10 AM