अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी येथील रहिवासी एका विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना गुरुवारी समोर आली. या विवाहितेस मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अनिल वामन खंडारे यांनी तक्रार दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचा विवाह दोन वर्षांपूर्वी कुंभारी येथील रहिवासी संतोष चंद्रमणी अंभोरे याच्यासोबत रितीरिवाजानुसार झाला होता; मात्र लग्नानंतर सासरकडील मंडळी विवाहितेला हुंडा आणण्याच्या कारणावरून शारीरिक, मानसिक छळ करीत होती. याच दरम्यान सासरकडील लोकांनी तिला रुग्णालयात भरती करून माहेरकडील मंडळीला तशी माहिती दिली. यावेळी विवाहितेची चौकशी केली असता, तिने सांगितले की, सासरकडील लोक तिचा छळ करून मारहाण करीत असल्याची माहिती दिली. अशा तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी सासरकडील सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ अ, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमधील संतोष अंभोरे, चंद्रमणी अंभोरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विवाहितेवर प्राणघातक हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:59 AM