अकाेला : घुसर येथील ग्रामपंचायतची मतमाेजनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असतांनाच दाेन चुलत भाउ आपसात भीडले. त्यानंतर एकाने दुसऱ्यावर पुर्व वैमनस्यातून चाकूने हल्ला केल्याची घटना साेमवारी दुपारी घडली. यामध्ये दिपक गाेपनारायण जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय धान्य गाेदामात साेमवारी मतमाेजनी सुरु हाेती. त्यामूळे अकाेला तालुक्यातील शेकडाे गावातील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर जमा झाले हाेते. एक एक गावचा निकाल हाेती येत असतांनाच घुसर येथील मतमाेजनी सुरु झाली. दरम्यान घुसर येथील रहीवासी सुरेश गाेपनारायण याने पुर्व वैमनस्यातून दिपक गाेपनारायण यांच्यावर चाकुने हल्ला चढवीला. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी दिपकला वाचवीले. बाजुलाच असलेल्या पाेलीसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून आराेपी सुरेशला ताब्यात घेतले. त्याच्यािविरुध्द सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाेन भावंडामध्ये आपसातील वाद असल्याने हा हल्ला झाल्याची माहीती पाेलीसांनी दिली. या वादाचा तसेच हल्याचा ग्रामपंचायत निवडणुकीशी संबध नसल्याचेही पाेलीसांचे म्हणणे आहे.