अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहरपेठ येथील रहिवासी एक युवक दाेन युवकांमध्ये सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेला असता या युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरिहरपेठेतील रहिवासी सचिन अरुण बाेरेकर हे त्यांच्या दुचाकीने घराकडे जात असताना त्यांना हरिहरपेठेतील किरण मेडिकलजवळ गाेलू चांदूरकर व दर्शन तेलंगडे यांच्यात वाद सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे बाेरेकर यांनी दाेघांनाही समजावण्याचा प्रयत्न करीत वाद न करण्याची विनंती केली; मात्र त्यानंतर यावेळी संतापलेल्या गाेलू चांदुरकर याने मध्यस्थीसाठी आलेल्या युवकालाच मारहाण करण्याचा इशारा त्याच्या साथीदारांना केला. यावरून त्याचे साथीदार विक्की श्रीनाथ, विक्की बुंदेले, बल्लू बुंदेले, गाैरव कातखेडे यांनी सचिन बाेरेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये बाेरेकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जुने शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या युवकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 18:01 IST
संतापलेल्या गाेलू चांदुरकर याने मध्यस्थीसाठी आलेल्या युवकालाच मारहाण करण्याचा इशारा त्याच्या साथीदारांना केला.
भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या युवकावर प्राणघातक हल्ला
ठळक मुद्देबाेरेकर यांनी दाेघांनाही समजावण्याचा प्रयत्न करीत वाद न करण्याची विनंती केली. विक्की श्रीनाथ, विक्की बुंदेले, बल्लू बुंदेले, गाैरव कातखेडे यांनी सचिन बाेरेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला.