संतोष येलकर / अकोला:दुष्काळग्रस्त शेतकर्यांना सरकारकडून देण्यात येत असलेल्या मदतीमध्ये अल्प, अत्यल्प भूधारक शेतकर्यांना दोन हेक्टरपर्यंत, तर दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन संपादन करणार्या बहुभूधारक शेतकर्यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंतच मदत दिली जात आहे. दुष्काळी परिस्थितीत सर्वच शेतकर्यांचे नुकसान झाले असताना, मदत वाटपात हेक्टरी र्मयादेच्या नावाखाली दुजाभाव आणि बहुभूधारक शेतकर्यांवर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्यांच्या हातून गेली. नापिकीमुळे ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात शासनाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना मदत निधीचे वितरण केले असून, ही रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकर्यांना देण्यात येत असलेल्या मदतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकर्यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील सर्वच शेतकर्यांचे पिके हातून गेल्याने नुकसान झाले. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अल्प,अत्यल्प भूधारक शेतकरी असो की बहुभूधारक, या सर्वच शेतकर्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त सर्वच शेतकर्यांकरिता मदत वाटपासाठी शेती क्षेत्राची सारखीच र्मयादा असायला हवी; मात्र सरकारकडून वाटप करण्यात येत असलेल्या मदतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत, तर बहुभूधारक शेतकर्यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंतच मदत वाटप केली जात आहे. सरकारी मदतीत हेक्टरी र्मयादेचा दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप दुष्काळग्रस्त शेतकर्यांनी केला आहे.जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामदास मालवे यांनी दुष्काळी परिस्थितीत सर्वच शेतकरी नुकसान झेलत आहेत; परंतु सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दिल्या जाणार्या मदतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकर्यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदत दिली जात आहे. हेक्टरी र्मयादेत शेतकर्यांना मदत वाटपातील हा भेदभाव दूर सारून समान हेक्टरी र्मयादेनुसार मदतीचे वाटप करण्याची मागणी केली.
मदत वाटपात हेक्टरी मर्यादेत दुजाभाव
By admin | Published: January 23, 2015 2:19 AM