अकोला : सहाय्यक संचालक हिवताप विभागात एकाच ठिकाणी ३0 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व महिला कर्मचार्यांना असभ्य वागणूक देणार्या नासीर हुसेन नामक कर्मचार्याची उचलबांगडी करुन त्याला त्याच्या मुळ पदावर हिवताम विभागात परत पाठविण्यात आले आहे. ह्यलोकमतह्णने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन रविवारी सुटीचा दिवस असूनही चौकशीचे आदेश दिले.नासीर हुसेन या कर्मचार्याची पदस्थापना जिल्हा हिवताप विभागात आरोग्य सहाय्यक म्हणून आहे. सदर कर्मचार्यास सहाय्यक संचालक हिवताप विभागात प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले होते. सदर कर्मचारी गत ३0 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे. हिवताप विभाग सहाय्यक संचालक कार्यालयातील अधिकारी व एका कर्मचार्याने महिला कर्मचार्यांचा छळ मांडल्याचा आरोप एका महिला अधिकार्याने आरोग्य उपसंचालकांना दिलेल्या तक्रारीत केला होता. महिला कर्मचार्यांचे वेतन रोखणे, बदलीच्या धमक्या देणे व अश्लील संभाषण हा प्रकार ह्यबिझनेस ब्लॅकमेलिंगह्णचाच असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता. लोकसेवा आयोगाद्वारे वर्ग दोनच्या पदावर लागलेल्या सदर महिला अधिकार्याचे वेतन रोखण्याचे अधिकार नसतानाही वेतन रोखण्याचा प्रताप सहाय्यक संचालक हिवताप डॉ.एम.एम. राठोड यांनी केला. तसेच सदर महिला अधिकार्याशी नासीर हुसेन या कर्मचार्याने असभ्य वर्तणूक केल्याचा आरोपही तक्रारीत करण्या त आला होता. हा प्रकार ह्यलोकमतह्णने उजेडात आणल्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी सहाय्यक संचालक हिवताप विभागात कार्यरत असलेल्या नासीर हुसेन नामक कर्मचार्याची प्रतिनियुक्ती तातडीने रद्द करून त्यांना जिल्हा हिवताप विभागात रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच महिला अधिकार्याचा छळ केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सहाय्यक संचालक हिवताप विभागातील कर्मचा-याची उचलबांगडी
By admin | Published: December 08, 2014 1:14 AM