अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पोलीस प्रशासनातील नि:शस्त्र पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या सहायक पोलीस निरीक्षकांना आधी पदोन्नती देण्यात आली असून, त्यानंतर त्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या असून, तातडीने रुजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे.अकोल्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक किशोर हिंमतराव शेळके यांची अमरावती शहर, वैभव यलप्पा पाटील यांची पी. टी. एस खंडाळा पुणे, दहशतवाद विरोधी पथकाचे तपन देवराम कोल्हे यांची अमरावती ग्रामीण, लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे बाबाराव दिनकर अवचार यांची अमरावती शहर, सायबर विभागाच्या सीमा मनोहर दाताळकर यांची अमरावती शहर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे, तर मुंबई शहरचे नितीन शंकर शिंदे, अमरावती ग्रामीणचे मुकुंद मधुकर ठाकरे, कोल्हापूरचे संजीवकुमार दत्तात्रय झाडे, यवतमाळचे अजय हेमराज भुसारी, नवी मुंबईचे राहुल सोमनाथ खताळ, नांदेडचे नितीनकुमार अजाबराव चिंचोळकर, अकोल्यातील माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार भाऊराव पुंडलिकराव घुगे, जळगावचे तुषार मुरलीधर अढाऊ, वाशिमचे लीलाधर शेषराव तसरे, पुणे शहरचे दिलीप नारायणराव जयसिंगकार, बुलडाणाचे प्रशांत जानराव कावरे, वाशिमचे अस्मिता जितेंद्र मनोहर, अमरावती शहरचे श्रीकृष्ण प्रल्हाद पवार, नंदकिशोर श्रीकृष्ण नागलकर यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक यांनी हा बदली, पदोन्नतीचा आदेश दिला असून, तत्काळ रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.
सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 1:44 PM