लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण मार्गावरील महावितरणचे कार्यालय ते लक्ष्मी ट्रेडर्सपर्यंत तयार झालेला बॉटल नेक दूर करण्यासाठी महापालिकेने गजराज चालवून हा मार्ग रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. ज्या वेगाने ही कारवाई सुरू झाली होती, ती गती आता थंडावली आहे. स्वत:हून बांधकाम पाडण्याचे दिलेले आश्वासन संथ गतीने पाळल्या जात आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांनी या मार्गावरील प्रतिष्ठानांना भेट देऊन तातडीने बांधकाम पाडा; अन्यथा बांधकाम पाडण्याची मोहीम महापालिकेला हाती घ्यावे लागेल, असे सुनावले. या मार्गावरील सर्वात मोठा अडसर ठरलेल्या वैभव हॉटेल मालकास एक महिन्याचा कालावधी दिला गेला, असून राठी यांना पंधरा दिवसांचा अवधी दिला गेला आहे. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरणाची प्रक्रिया आणखी काही दिवसांसाठी मंदावणार असल्याचे संकेत आहेत. मार्ग रुंदीकरणात काहींवर अन्याय होत असून, काहींना झुकते माप दिले जात आहे, असा आरोप दुकानदारांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण इतरांच्या इमारतींकडे पाहून आपले बांधकाम तोडत आहे. महापालिकेच्या अधिकार्यांनी नकाशे मंजुरीला परवानगी दिली, त्यांच्यावर महापालिका काय कारवाई करणार आहे, याबाबतही मनपाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
बांधकाम पाडण्याचे दिलेले आश्वासन संथ गतीने; गोरक्षण मार्ग रुंदीकरणाची गती मंदावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:36 AM
अकोला : गोरक्षण मार्गावरील महावितरणचे कार्यालय ते लक्ष्मी ट्रेडर्सपर्यंत तयार झालेला बॉटल नेक दूर करण्यासाठी महापालिकेने गजराज चालवून हा मार्ग रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. ज्या वेगाने ही कारवाई सुरू झाली होती, ती गती आता थंडावली आहे.
ठळक मुद्देवैभव हॉटेल मालकास एका महिन्याचा अल्टिमेटम