शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

अकोला येथील अथर्व तायडे, आदित्य ठाकरे यांची दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेकरिता निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 2:43 PM

Duleep Trophy: अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथे ५ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या  दुलीप चषक स्पर्धेकरिता भारत 'डी' संघात अकोला क्रिकेट क्लब तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचा सलामीचा डावखुरा फलंदाज अथर्व तायडे व शैलीदार मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे यांची निवड झाली आहे.

अकोला - अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथे ५ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या  दुलीप चषक स्पर्धेकरिता भारत 'डी' संघात अकोला क्रिकेट क्लब तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचा सलामीचा डावखुरा फलंदाज अथर्व तायडे व शैलीदार मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे यांची निवड झाली आहे.

अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावखुरा शैलीदार फलंदाज असून, यापूर्वी त्याने १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रणजी ट्रॉफी व भारतात सर्वात प्रतिष्ठीत असणारी इराणी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले असून, अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघ हा १९ वर्षीय स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे. यावर्षी आय.पी.एल स्पर्धेत अथर्वने पंजाब किंग्स संघाचे  प्रतिनिधित्व केले आहे. शैलीदार मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे याने यापूर्वी १६, १९, २३ स्पर्धेत विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले असून, १९ वर्षीय भारतीय संघाकडून आशिया चषक (मलेशिया) तर न्यूझीलंड येथे झालेल्या १९ वर्षीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

इराणी ट्रॉफी व रणजी ट्रॉफी स्पर्धेत तो खेळला आहे. दोन्ही खेळाडूंनी यावर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल असून, विदर्भ संघाने यावेळी मुंबई संघासोबत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चांगली झुंज दिली होती. या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांची करांना स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

टॅग्स :Akolaअकोला