वयाच्या ८ वर्षापासून अकोला क्रिकेट क्लबवर खेळणाऱ्या अथर्वने यापूर्वी त्याने १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले असून, सध्या रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघ हा १९ वर्षीय बी.सी.सी.आय. स्पर्धेत अजिंक्य राहिला असून, याच स्पर्धेतही भारताकडून खेळण्याची त्याला संधी मिळाली असल्याची माहिती अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.
अथर्वचा एकूणच सर्व कामगिरी अभिमानास्पद असून, इंग्लंडमधील लांकेशायर क्रिकेट क्लबकडून करारबद्ध झाल्याबद्दल त्याचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, ऑडिटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य ॲड. मुन्ना खान, गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेदअली, परिमल कांबळे, रणजी खेळाडू रवी ठाकूर, प्रशिक्षक सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, शारिक खान, देवकुमार मुधोळकर, एस. टी. देशपांडे, किशोर धाबेकर आदींनी कौतुक केले.