यासाठी ॲथ्लेटिक्स खेळामध्ये राज्यस्तरावर पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू ज्यांचे वय २० वर्षाआतील असून, राज्य निपुणता केंद्रांतर्गत प्रवेशासाठी स्पर्धा बाबींसाठी निश्चित केलेल्या मानकानुसार पात्र ठरत असलेल्या मुले व मुली खेळाडूकरिता निवड चाचणीचे आयोजन दि. २२ ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खेळाडूस कोविड व्हॅक्सीन, आर.टी.पी.सी.आर. टेस्ट प्रमाणपत्र, नाव, जन्मदिनांक, शिक्षण, खेळाचा प्रकार,क्रीडा विषयक कामगिरी प्रमाणपत्र, स्पर्धेचे नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता इत्यादी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहणार आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडुंची निवास व्यवस्था करण्यात आली असून, प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करावा लागणार आहे. पात्र खेळाडूंनी अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी दिनकर उजळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
----------------
असे केले नियोजन
दि. २२ सप्टेंबर रोजी १०० मी., २०० मी., ४०० मी. धावणे व ११० मी., १०० मी, ४०० मी.अडथळा, दि.२३ सप्टेंबर रोजी ८०० मी., १५०० मी., ३००० मी., ५००० मी. धावणे, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, दि. २४ सप्टेंबर रोजी पाच कि.मी. चालणे, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक इत्यादी उपप्रकाराच्या चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.