चोहोट्टा बाजार : दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चोहोट्टा बाजार येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी ही गर्भवती असून, अत्याचार करणाऱ्या युवकास पोलिसांनी गजाआड केले आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर शिवा देवलाल भांडे याने जिनिंगमध्ये नेऊन अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवा भांडे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार वनारे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सतीश दानकलवार व सहकारी करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी गजाआड
By admin | Published: May 02, 2017 1:23 AM