शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

पोलिसांवर हल्ला करून गुरे पळवली; दोघांना अटक

By admin | Published: July 10, 2017 7:47 PM

हिवरखेडजवळील घटना; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड: गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या हिवरखेड पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला करून गुरे पळवून नेली. ही घटना हिवरखेडजवळ १० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी १५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा जंगलातून अवैधपणे गुरे हिवरखेड येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांवर पाळत ठेवली. सकाळी ९.३० वाजता दोन वाहनांमध्ये गुरे येत असल्याचे दिसताच ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या पथकाने ही वाहने अडवली. त्यांची तपासणी केली असता वाहन क्र.एमएच ३० एबी ४२०२ यामध्ये तीन बैल तर वाहन क्र.एमएच ३० एबी १९८२ मध्ये पाच बैल असल्याचे आढळले. पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांना बैलांच्या खरेदीविषयी कागदपत्रे मागितली असता त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे आढळली नाहीत. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची माहिती हिवरखेड येथील काही लोकांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच पोलिसांबरोबर धक्काबुक्की केली व दुसऱ्या वाहनातील पाच बैल पळवून नेले. अचनाक घडलेल्या घटनेमुळे पोलिसही गोंधळून गेले होते. या प्रकरणी हेकॉ नंदू सुलताने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी अ. शरीफ अ. लतीफ रा. धुलघाट, शे. रईस इक्रमोद्दीन यांच्यासह १५ जणांविरुद्ध भादंवि १४३, ३५३, ३३२, १८६, १२०ब, ५ (५ अ), ९, ९(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार निशांत मेश्राम, नंदू सुलताने, नीलेश तायडे, राजू इंगळे, अमोल पवार करीत आहेत.