लोकमत न्यूज नेटवर्कगायगाव : येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गायगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत अज्ञात चोरट्यांनी २५ जुलै रोजी रात्री शटर्सचे टाळे तोडून प्रवेश केला, तसेच बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. तिजोरी फोडता आली नसल्याने चोरट्यांनी बँकेतील साहित्याची फेकाफेक केली. सकाळी बँक उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांच्या ही बाब लक्षात आली. घटनेची माहिती तातडीने उरळ पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सोमनाथ पवार, बिट जमादार लिखार, मोरे आदींनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. बँक व्यवस्थापक वानखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गावात काही दिवसांपूर्वी पानपट्टी फोडून चोरट्यांनी साहित्य लंपास केले होते. त्यानंतर आणखी एक चोरीचा प्रयत्न झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.
गायगाव येथील बँक फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:12 AM