लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सौभाग्य ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी तीन किलो चांदी चोरून नेल्यानंतर या चोरट्यांनी अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील एकवीरा ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे महिला व युवकांना दिसल्यानंतर त्यांनी दगडफेक करताच चोरटे पळून गेले. ही घटना सोमवारच्या रात्री घडली. वाडेगाव येथील सौभाग्य ज्वेलर्स चोरट्यांनी रात्री २ वाजताच्या सुमारास फोडले. त्यातून चोरट्यांनी तीन किलो चांदी चोरून नेली. त्यानंतर त्यांनी अकोल्यातील मोठी उमरी येथील एकवीरा ज्वेलर्सकडे मोर्चा वळवला. चोरट्यांनी ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र दुकानाच्या शेजारी राहणारे विष्णू चोरे यांना दुकानाचे शटर तोडण्याचा आवाज आल्याने त्यांनी दुकान मालक तळोकार यांना फोन लावून बोलावून घेतले; मात्र चोरटे पळून गेले. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला; मात्र चोरटे त्यांच्या हाती लागले नाहीत.
अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:01 AM
अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील एकवीरा ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे महिला व युवकांना दिसल्यानंतर त्यांनी दगडफेक करताच चोरटे पळून गेले. ही घटना सोमवारच्या रात्री घडली.
ठळक मुद्देएकवीरा ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्ननागरिकांनी दगडफेक करताच चोरटे पळून गेले