अकोला : शहरातील ‘नेकलेस रोड’वर पथदिवे लावण्यात आले नसल्याने, रस्त्यावरील अंधाराच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोला शहर शाखेच्यावतीने मंगळवारी रात्री कंदील लावून अभिनव आंदोलन करण्यात आले.
शहरातील वर्दळीच्या नेकलेस रोडचे काम करण्यात आले; मात्र सिव्हील लाइन्स चौक ते नेहरू पार्कपर्यंतच्या या रस्त्यावर पथदिवे अद्याप लावण्यात आले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने अनेकदा अपघाताचे प्रसंग घडतात. त्यामुळे या रस्त्यावरील अंधाराची समस्या दूर करण्यासाठी रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावे तसेच रस्त्यावरील विद्युत रोहित्र आणि खांब काढून रस्ता माेकळा करण्यात यावा व रस्त्यावरील मोकाट जनावरांचा संचार थांबविण्याची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडी अकोला शहर शाखेच्यावतीने रस्त्यावर कंदील लावून ‘नेकलेस रोड’वरील अंधाराच्या समस्येकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या अभिनव आंदोलनात वंचित बहुजन आघाडी अकोला शहर (पूर्व) चे अध्यक्ष शंकरराव इंगळे, महिला आघाडी शहर अध्यक्ष वंदना वासनिक, गजानन गवई, नगरसेविका किरण बोराखडे, सचिन शिराळे, गजानन दांडगे, ॲड. आकाश भगत, नीतेश किर्तक, शुक्लाेदन डोंगरे, सतीश वानखडे, अवधूत खडसे, गोलू खिल्लारे, शुद्धोदन पळसपगार, शंकर इंगोले, सुरेश कलोरे, पुरुषोत्तम वानखडे आदी सहभागी झाले होते.
............................फोटो..................