शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

ऑगस्ट महिन्याचे वेतन ‘ऑफलाइन’

By admin | Published: September 21, 2015 1:36 AM

‘शालार्थ’ प्रणाली अद्यापही नादुरुस्तच असल्यामुळे शिक्षकांना ऑफलाइन वेतन मिळणार.

अकोला: तांत्रिक बिघाडामुळे 'शालार्थ' संगणक प्रणाली गत २0 दिवसांपासून बंद असल्याने राज्यातील शिक्षकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. गणेशोत्सव तसेच इतर सण-समारंभ पाहता शिक्षकांचे वेतन ऑफलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एका महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निकाला काढण्यात आला असला तरी शालार्थ संगणक प्रणाली अद्यापही बंदच असल्याने शिक्षकांच्या पुढील वेतनाचा प्रश्नही कायम आहे. 'शालार्थ' संगणक प्रणालीत गत पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाड असल्याने वेतन देयके समाविष्ट करण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना ऑगस्ट महिन्यापासून विनावेतन काम करावे लागत आहे. एकीकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, ह्यशालार्थह्ण संगणक प्रणाली बंद पडल्यामुळे शिक्षकांना सप्टेंबरमध्येही विनावेतनावरच दिवस भागवावे लागणार की काय? अशी चिंता शिक्षकांमध्ये पसरली आहे. सध्या गणेशोत्सव व इतर सण-समारंभाचा काळ असल्यामुळे विशेष बाब म्हणून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन 'ऑफलाइन' घेण्याचा निर्णय शासनाने बुधवारी घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांसाठी सण समारंभाचा कालावधी आनंदाचा जाणार आहे. एका महिन्याच्या वेतनाचा प्रश्न शासनाने मार्गी लावला असला तरी अद्याप वेतनाबाबत निर्माण झालेली मूळ अडचणच सोडविण्यात आली नसल्याने यापुढेही वेतनाचा प्रश्न कायमच राहणार आहे.