अकोला: जिल्ह्यातील ९४२ गावांमध्ये २३ मार्च २0१६ च्या शासननिर्णयाप्रमाणे दुष्काळी स्थिती घोषित करण्यात आली; मात्र शासनाकडून दुष्काळ घोषित झाल्यानंतरही दुष्काळी मदतवाटपाबाबत मार्गदर्शक सूचनाच देण्यात आल्या नसल्याने दुष्काळग्रस्तांना मदतवाटप करण्याबाबत जिल्हा प्रशासन संभ्रमात सापडले आहे. त्यामुळे केवळ घोषणांचा सुकाळ आणि प्रत्यक्ष भरीव मदतीचा ह्यदुष्काळह्णच दिसून येत आहे. गतवर्षी जून महिन्याच्या प्रारंभी दमदार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांनी पेरणी केली; मात्र नंतर २५ पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारली. परिणामी काहींवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली. तरीही अल्प पावसामुळे उत्पादन प्रचंड घटले. मशागत व लागवडीसाठी कर्ज काढले. प्रसंगी संपूर्ण कुटुंबच शेतात राबले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकावा व खरीप हंगामातील पेरणी व मशागतीसाठी पैसा कोठून आणवा, असे एक ना अनेक प्रश्न शेतकर्यांना पडले आहेत. त्यामुळे तातडीने रोख स्वरूपात मदत देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
घोषणांचा सुकाळ, मदतीचा दुष्काळ!
By admin | Published: April 07, 2016 1:58 AM