अकोला : संचारबंदी लागू करताना शासनाने ऑटो चालकांना १,५०० रुपये मदत जाहीर केली होती. या मदतीचा लाभ जिल्ह्यातील १६ हजार १०२ ऑटो चालकांना मिळणार आहे. या घोषणेला बरेच दिवस झाले असून ऑटो चालकांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे हे ऑटो चालक मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
------------------------------------------------
तुरीचे दर सात हजारांवर स्थिर
अकोला : बाजार समितीत तुरीची आवक सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून तुरीचे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहे. तुरीला कमीत कमी ६ हजार २०० तर सर्वसाधारण ६ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. सोमवारी बाजार समितीत तुरीची ४६१ क्विंटल आवक झाली होती.
----------------------------------------------
शासकीय कार्यालयांत शुकशुकाट
अकोला : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या १५ टक्के उपस्थिती आहे. शासकीय कार्यालयात राहणारी अभ्यागतांची गर्दीही ओसरली आहे.
----------------------------------------------------
फळ तपासणी करण्याची मागणी
अकोला : केळी व इतर फळे पिकविण्यासाठी कार्बाईड या विषारी रासायनिक पदार्थाचा वापर केला जाताे. कार्बाईडने पिकविलेली फळे खाल्ली जात असल्याने बालकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे बाजार फळे विक्रीसाठी ठेवण्यापूर्वी त्यांची तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.